Konkan 12th results 2025 : याही वर्षी कोकणची पोरं लई हुश्शार..! पण कोकणच्या यशामागे काय आहे ‘फॉर्म्युला’?

Rashmi Mane

निकाल 2025

दरवर्षीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वी व 12 वी परीक्षेत कोकण विभाग नेहमीच आघाडीवर असतो. यावर्षीही तोच इतिहास कायम राखत कोकण विभाग: 96.74% लागला आहे. पण यामागचं खरं कारण काय?

Maharashtra Board HSC Results 2025 | Sarkarnama

मुलींची बाजी

दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचा निकाल 89.51 टक्के तर मुलींचा निकाल 94.58 टक्के लागला आहे.

Maharashtra Board HSC Results 2025 | Sarkarnama

कोकण अव्वल स्थानी, तर लातूरचा सर्वात कमी

कोकण – 96.74%, कोल्हापूर – 93.64%, मुंबई – 92.93%, संभाजीनगर – 92.24%, अमरावती – 91.43%, पुणे – 91.32%, नाशिक – 91.31%, नागपूर – 90.52%, लातूर – 89.46%

Maharashtra Board HSC Results 2025 | Sarkarnama

पण हे शक्य होतं कसं?

महाराष्ट्रात सर्वाधिक यश पुन्हा एकदा कोकणच्या वाट्याला. पण हे शक्य होतं कसं?

Maharashtra Board HSC Results 2025 | Sarkarnama

अभ्यासासाठी योग्य वातावरण

कोकणात शहरी गोंगाट नाही, निसर्गाच्या सान्निध्यात एकाग्रता टिकते, अभ्यास सखोल होतो.

Maharashtra Board HSC Results 2025 | Sarkarnama

शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष

विद्यार्थ्यांची संख्या कमी, त्यामुळे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतात. शंका समजून घेऊन त्या सोडवल्या जातात.

Maharashtra Board HSC Results 2025 | Sarkarnama

मूळ संकल्पनांवर भर

कोकणात क्लासेसपेक्षा शाळेतील शिकवण आणि पुस्तकांवर भर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बेसिक्स मजबूत होतात.

Maharashtra Board HSC Results 2025 | Sarkarnama

मानसिक स्थैर्य आणि तणावमुक्तता

तिथे शिक्षण म्हणजे स्पर्धा नसून विकासाचं साधन मानलं जातं. तणाव नसेल तर गुणवत्ताही टिकते.

Maharashtra Board HSC Results 2025 | Sarkarnama

Next : पाकिस्तानच्या झेंड्यातील चंद्रकोरीचा अन् चांदणीचा अर्थ काय? तुम्हाला नक्कीच माहिती नसणार P

येथे क्लिक करा