Aslam Shanedivan
२०१४ ते २०२४ दरम्यान पुन्हा लोकसभेवर निवडून आलेल्या १०२ खासदारांच्या संपत्तीत दुपट्ट वाढ झाली आहे.
'एडीआर'च्या अहवालानुसार संपत्तीत तब्बल ११० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ मधील १५.७६ कोटींवरून ही संपत्ती २०२४ मध्ये ३३.१३ कोटी झालीय.
या अहवालानुसार सर्वाधिक वाढ झारखंडच्या आदिवासी बहुल राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांची संपत्ती वाढली आहे. ती ८०४ टक्क्यांनी वाढली आहे.
या लिस्टमध्ये साताऱ्यातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वांना मागे टाकले असून त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ दिसली आहे.
२०१४ मध्ये त्यांची संपत्ती ६० कोटी रुपये होती. ती २०२४ मध्ये २२३ कोटी रुपये झालीय. जी २६८ टक्क्यांनी वाढ आहे.
दुसरा क्रमांकावर असदुद्दीन ओवैसी यांचा 'एमआयएम'असून त्यांच्या खासदारांच्या संपत्तीत ४८८ टक्के वाढ नोंदवली गेलीय. तिसऱ्या स्थानावर बिहारमधील जनता दल युनायटेडचे खासदार आहेत.
गुजरातच्या जामनगरच्या भाजप खासदार पूनमवेन माडम यांची संपत्ती त्यांच्या संपत्तीत ७४७ टक्के वाढ झालीय. दहा वर्षांत हा आकडा १४७ कोटी रुपये झाला आहे.
मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांची संपत्ती १७८ कोटीवरून वाढून २७८ कोटी झाली असून तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती १३१ कोटींवरून २१० कोटी झालीय. त्यांच्या संपत्तीत ७८ कोटी रुपयांची वाढ झालीय.