Pradeep Pendhare
अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
देशाच्या इतिहासातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण कोणी दिले, याची चर्चा होत आहे.
देशाच्या अर्थसंकल्पीय इतिहासातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं.
निर्मला सीतारमण यांनी 2020 मध्ये संसदेत अंदाजे 2 तास 42 मिनिटे अर्थसंकल्पीय सर्वात लांब भाषण दिले.
निर्मला सीतारमण यांनी 2019 च्या अर्थसंकल्पीय भाषणाचा स्वतःचाच विक्रम मोडत, त्यावेळी 2 तास 17 मिनिटाचं भाषण केलं.
2024 च्या अर्थसंकल्प केवळ 56 मिनिट, तर 2025चे त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण अंदाजे 1 तास 17 मिनिटे होतं.
अर्थसंकल्पीय भाषण शब्दांच्या संख्येने मोजले, तर हा विक्रम 1991 चा आहे. तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी संसदेत अंदाजे 18 हजार 650 शब्दांचे अर्थसंकल्पीय भाषण दिले.
दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक भाषण अरुण जेटली यांनी सादर केले. 2018 चे अर्थसंकल्पीय भाषण, जे अंदाजे 18 हजार 604 शब्दांचे होते.