Aslam Shanedivan
टेबल लँड म्हणून ओखळ असलेल्या महाबळेश्वर आणि पानशेतमध्ये सध्या साहसी खेळांच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात.
पण आता याचा रोमांचक थरार कोल्हापुरकरांना जिल्ह्यातच घेता येणार आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक भुदरगड किल्ल्यावर या साहसी खेळांच्या ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या आहेत.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंच असलेल्या या किल्ल्यावर नैसर्गिक वाऱ्याच्या वेगाचा वापर करून वन विभागाच्यावतीने सुरू पॅरामोटरिंगसह साहसी खेळांचा शुभारंभ करण्यात आला आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या साहसी खेळांच्या ऍक्टिव्हिटीज उद्घाटन केले.
यावेळी त्यांनी पॅरामोटरिंगचा रोमांचक थरार अनुभवला. यावेळी त्यांनी काहीशी भीती तर मनात थाकधुक होती असा अनुभव कथीत केला.
तसेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथील दुधी तलावात बोटिंगचा मनमुराद आनंदही लुटला.
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले भुदरगडावर पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंग, टेलिस्कोप, फ्लोटिंग जेटी या साहसी खेळाचा आनंद घेता येणार आहे.
तसेच या ठिकाणी वन विभागाच्या मदतीनं पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात आलं आहे.