Pradeep Pendhare
बिहार विधानसभा निवडणुकीत जमिनीसोबतच हवाई मार्गांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला गेला.
नेत्यांना घेण्यासाठी अन् आणण्यासाठी दररोज 25 हेलिकॉप्टर आणि 12 चार्टर्ड विमाने पाटणा विमानतळावरून उड्डाणं करत होती.
25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत 121 जागांच्या पहिल्या टप्प्यात हेलिकॉप्टरची सुमारे 210 वेळा उड्डाण केले.Bihar Assembly election
यानुसार नेत्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर दिवसातून सरासरी 15 ते 18 वेळा पाटण्यातील प्रचारस्थळी पोहोचायचे.
दुसऱ्या टप्प्यात, 1 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत 122 जागांवर निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरने सुमारे 240 वेळा उड्डाण केले.
प्रचाराच्या शेवटच्या 3 दिवसांत, हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. या कालावधीत सरासरी हेलिकॉप्टर दररोज 20 ते 23 वेळा उड्डाण करत होते.
बिहारमध्ये निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, मोठ्या राजकीय खेळाडूंनी 26 वेळा हेलिकॉप्टरचा वापर केला.
RJD नेता तेजस्वी यादव यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 16 जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी हेलिकाॅप्टरने प्रवास केला.
नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, नितीशकुमार, चिराग पासवान, जीतन राम मांझी हे निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते.Bihar Assembly election
काँग्रेस राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकीत तब्बल 15 सभा घेत वातावरण निर्मिती केली.