Rashmi Mane
बीडकरांचे दीर्घकाळचे स्वप्न अखेर पूर्ण… अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेचा शुभारंभ आज झाला.
मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी बीड-अहिल्यानगर रेल्वेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेचे लोकार्पण करण्यात आले.
नगरहून सुटलेली गाडी नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी, अमळनेर (भांड्याचे), रायमोह, एगनवाडी, जाटनांदूर, राजुरीमार्गे बीड येथे पोचेल.
अहिल्यानगरहून सकाळी 6:55 प्रस्थान करणारी रेल्वे दुपारी 12:30 ला बीड असेल तसेच पुन्हा परतीची गाडी दुपारी 1 वाजता सुटून संध्याकाळी 6: 30 ला अहिल्यानगरला पोचणार आहे.
अहिल्यानगर ते बीड फक्त 45 रुपयामध्ये प्रवास शक्य होणार आहे.
1995 मध्ये मंजूरी मिळालेला या प्रकल्पाला तेव्हा खर्च 355 कोटी होता. आता तो तब्बल 4800 कोटींवर पोचला आहे.
बीडमधील बहुप्रतीक्षित रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्याचा निम्मा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला होता.
केंद्र-राज्य समान खर्चाचा हा पहिलाच उपक्रम ठरला होतं. आता पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे धावण्याचे स्वप्न साकार होत आहे.