Rashmi Mane
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी घालून दिलेला खास नियम आजही चर्चेत आहे.
मुख्यमंत्रीपदावर असताना मोदींनी प्रशासन आणि पक्षसंघटना यांच्यातील नाळ घट्ट ठेवण्यासाठी एक आगळावेगळा नियम घालून दिला होता.
प्रत्येक मंत्र्याच्या फोनमध्ये भाजपच्या जिल्हा कार्यालयाचा नंबर असलाच पाहिजे, अशी सक्ती त्यांनी केली होती.
मंत्री बैठकीत असो वा कार्यक्रमात; जिल्हा कार्यालयातून फोन आला तर तो उचलणे, उलट फोन करणे ही सक्त सूचना होती.
या शिस्तीमुळे दोन गोष्टी साध्य झाल्या पहिली म्हणजे कार्यकर्त्यांची थेट संपर्क साधण्याची सवय वाढली आणि मंत्र्यांमध्ये संघटनेशी उत्तर देण्याची जाणीव रुजली.
मोदी नेहमी संघटनेच्या बैठकीत पूर्णवेळ उपस्थित राहायचे आणि स्वतःला कार्यकर्ता मानूनच वागत.
मोदींच्या या नियमांमुळे पक्ष आणि कार्यकर्ता संबंध मजबूत झाले. आणि..
बैठकीत वा संघटनेत स्वतःला ‘कार्यकर्ता’ म्हणून सादर करण्याची त्यांची मनोवृत्तीही रूजली गेली.