Ban on EVM : निवडणुकीनंतर 'या' देशांनी EVM वर घातली बंदी, आता बॅलेट पेपरवर मतदान

Jagdish Patil

EVM

भारतात प्रत्येक निवडणुकीनंतर EVM चा मुद्दा चर्चेत येतो. नुकतंच महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर विरोधकांनी EVM मध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला होता.

EVM | Sarkarnama

'ईव्हीएम'वर बंदी

मात्र, काही देशांनी निवडणुकीत 'ईव्हीएम'चा वापर केल्यानंतर त्यावर बंदी घातली आहे. हा निर्णय कोणत्या देशांनी घेतला आहे ते जाणून घेऊया.

EVM Controversy | Sarkarnama

EVM म्हणजे काय?

EVM म्हणजे 'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन' ज्यामध्ये 2 युनिट्स असतात. एक कंट्रोल युनिट: जे मतदान अधिकाऱ्याकडे असतं, दुसरं बॅलेट युनिट ज्यावर मतदान केलं जातं.

EVM Voting Machine | Sarkarnama

'EVM' वर बंदी

भारताच्या शेजारचा देश बांगलादेशने नुकतीच 'ईव्हीएम'च्या वापरावर बंदी घातली आहे.

EVM Controversy | Sarkarnama

EVM शिवाय निवडणूक

तर जपानसह जर्मनी, नेदरलँड आणि आयर्लंडसारख्या देशांनीही EVM शिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

EVM Controversy | Sarkarnama

जपान

2018 च्या महापालिका निवडणुकीनंतर जपानने 'ईव्हीएम'चा वापर बंद केला आहे.

EVM Controversy | Sarkarnama

बांगलादेश

बांगलादेशने 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 'ईव्हीएम'चा वापर केला होता, मात्र, विरोधी पक्षाच्या मागणीनंतर 2023 पासून तिथे बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडते.

EVM | Sarkarnama

जर्मनी

तर 2009 मध्ये जर्मनीत कोर्टाने ईव्हीएमला असंवैधानिक ठरवलं, यावेळी न्यायालयाने नागरिकांना मतदान प्रक्रियेची तपासणी करणं कठीण होत असल्याचं कारण दिलं होतं.

EVM | Sarkarnama

पाकिस्तान

पाकिस्तानसारखे देश आता 'ईव्हीएम'चा वापर करण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानने एक प्रोटोटाइप EVM तयार केलं आहे, ज्याचा ते आगामी निवडणुकीत वापर करण्याची शक्यता आहे.

EVM | Sarkarnama

NEXT : वडिलांनी आव्हान दिलं म्हणून सलग 3 वर्ष पहिला क्रमांक पटकावणारे बीडचे नवे SP कोण?

SP Navneet Kanwat | Sarkarnama
क्लिक करा