Aslam Shanedivan
गेल्या काही दिवसापांसून हैराण केलेल्या अतिवृष्टीने आता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आता ई-पीक पाहणीमध्ये नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे.
पण आता घाबरण्याचे आणि चिंता करण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या महसूल विभागाने सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी प्रक्रिया सुरु आहे.
पीक कर्ज पडताळणीसाठी पीक पाहणी महत्त्वाची ठरते. तसेच ती पीक विम्यासाठीही गृहित धरण्यात येते.
पूर, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास भरपाई मिळवण्यासाठी पीक पाहणीचा फायदा होतो.
किमान आधारभूत किमतीत शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्याची संमती घेतली जाते.
पीक पाहणी झाली असेल तर ॲग्रीस्ट्रॅक अंतर्गत सर्व योजना आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळतो.
शेतजमिनीवर नेमके कोणते पीक घेतले आहे? याची अचूक नोंद शासन दप्तरी होण्यासाठी ई- पीक पाहणी महत्वाची ठरते. तर त्या पिकाची नोंद 7/12 होते.