Rajanand More
हरियाणातील पोलीस महानिरीक्षक वाय. पूरन कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्याआधी त्यांनी मृत्यूपत्र लिहून ठेवले होते. हे मृत्यूपत्रानुसार त्यांनी आपली सर्व संपत्ती पत्नीच्या नावे केली आहे.
हरियाणा सरकारमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेल्या IAS अधिकारी अमनीत पी. कुमार या पूरन कुमार यांच्या पत्नी आहेत. मृत्यूनुसार सर्व संपत्ती त्यांना मिळणार आहे.
गुरूग्राम यूनिव्हर्सल बिझनेस पार्कमध्ये ऑफिस स्पेस, चंदीगढमधील सेक्टर-11ए मध्ये घर क्रमांक 116 मध्ये 25 टक्के भागीदार आहे.
मोहालीमध्ये पूरन कुमार यांची जमीन आहे. एसएएस नियाग्रा येथील आयटी सिटीतील सेक्टर 83/अल्फा, ब्लॉक-बी मध्ये त्यांची मालमत्ता आहे.
आयपीएस पूरन यांचे बँक खाते तसेच बचत खात्यांमधील रक्कम त्याचप्रमाणे बँक खात्यांशी जोडलेल्या डीमॅट खात्यांमधील शेअरही पत्नी अमनीत यांच्या नावे होतील.
केंद्र सरकारकडून आयपीएस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी आणि नियमानुसार इतर निधी मिळतो. फॅमिली पेन्शनमध्ये अंतिम वेतनाचा 30 ते 50 टक्के हिस्सा मिळतो.
केंद्र सरकारद्वारे इन्शूरन्स योजनाअंतर्गत जीवन विमाही संबंधित कुटुंबाला दिला जातो. ही व्यवस्था संबंधित कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार असते.
राज्य केडरच्या आधारेही काही राज्यांमध्ये कुटुंबाला पेन्शन तसेच पोलीस वेल्फेअर फंडसारख्या योजनांतून आर्थिक मदत मिळते. त्याचप्रमाणे सरकारी क्वार्टर, आरोग्याच्या सुविधा, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आदी योजना राबविल्या जातात.