Jagdish Patil
देशभरात पुण्याची ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरचे प्रकरण गाजत आहे.
देशभरातून पूजा प्रमाणे परीक्षा पास होण्यासाठी अनेकांनी गैरप्रकार केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे UPSC च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पूजाच्या 'कार'नाम्यानंतर देशभरातून अशीच अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशातच ज्योती मिश्रा हे नाव चर्तेत आलं आहे. ज्योतीचे कारनामे एखाद्या सिनेमालाही लाजवतील असे आहेत.
ज्योतीने UPSC परीक्षा पास न होता बनावट कागदपत्राच्या आधारे पास झाल्याचं भासवलं. तब्बल 2 वर्षे तिने सर्वांना फसवलं.
ज्योती पास झाली म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरुन तिच्यासाठी पोस्ट करण्यात आली होती.
2021 चा UPSC निकाल शोधला असता निकालावर नाव असलेली ज्योती आणि IFS म्हणून वावरत असलेली ज्योती या वेगवेगळ्या असल्याचे समोर आलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे तिने बनावट सरकारी कागदपत्र आणि आयडी कार्डही तयार केलं होतं.
नेटकऱ्यांमुळे ज्योतीचा घोटाळा समोर आला. मात्र, पूजा-ज्योतीसारखे किती अधिकारी अद्याप सरकारी सेवेत रुजू आहेत? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.