Pradeep Pendhare
हरियाणात विधानसभा निवडणूक मित्रपक्षांना टाळून काँग्रेसनं स्वबळावर लढवली.
काँग्रेस आणि भाजप असा सरळ लढतीत, काँग्रेसला 37 एवढ्या, तर भाजपने बहुमत घेत 48 जागा मिळाल्या.
जेव्हा जेव्हा काँग्रेसचा भाजपशी थेट संघर्ष झाला, तेव्हा तेव्हा त्यांचा पराभव का होतो? अशी टीका शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस असो की भाजप, प्रादेशिक पक्षांशिवाय ते सत्तेत येऊ शकत नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आम्हाला एकही जागा देऊ केली नाही, अशी टीका समाजवादी पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते राजीव राय यांनी केली.
प्रादेशिक पक्षांनीच भाजपाला थेट टक्कर दिली आहे. काँग्रेसने हे सत्य स्वीकारले पाहिजे, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सागरिका घोष यांनी केली.
काँग्रेसने काहीतरी शिकावे. महाराष्ट्राची निवडणूक योग्य हाताळावी, असं तमिळनाडूमधील द्रमुक पक्षाचे प्रवक्ते सर्वनन अण्णादुराई यांनी सुनावलं.
काँग्रेसने हरियाणा निवडणुकीत आम्हाला बरोबर घेतले नाही, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांची टीका.