Pradeep Pendhare
जम्मू काश्मीर निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसच्या मदतीने इंडिया आघाडीला बहुमत मिळालं आहे.
ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
ओमर अब्दुल्ला यांची 10 वर्षे जुनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील एक पोस्ट व्हायरल होत आहे.
अब्दुल्ला यांनी त्यात, “Keep Calm.. cause… i’ll be back” म्हणजेच, थोडा धीर धरा, कारण, मी पुन्हा येईन. असं म्हटलं होतं.
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम आणि गंदेरबल अशा दोन विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे.
भाजपचे जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला आहे.
2014 मध्ये जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार कोसळलं होतं.
गेल्या सहा वर्षांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. आता 10 वर्षांनी राज्यात विधानसभेची निवडणूक झाली.