Rajanand More
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरीधर गमांग यांनी बुधवारी (ता. 17 जानेवारी) काँग्रेसमध्ये घरवापसी केली. ते 2015 मध्ये भाजपमध्ये गेले होते.
गमांग हे नऊवेळा खासदार. १९९९ मध्ये खासदार असताना काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केलं. ते केवळ दहा महिने होते या पदावर.
मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन महिन्यांतच अटलबिहारी वाजपेयी सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठरावावेळी केलं मतदान.
वाजपेयी सरकारविरोधात 270 तर बाजूने 269 मते पडली. गमांग यांनी मतदान केले नसते तर समान मते झाली असती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या मताद्वारे सरकार वाचले असते.
मुख्यमंत्री असूनही गमांग यांनी केलेले मतदान वादात सापडले होते. या पदी गेल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता, अशी टीका झाली.
वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर मे १९९९ मध्ये लोकसभा निवडणूक. मुख्यमंत्रिपदी असल्याने पत्नीला दिले तिकीट.
2004 मध्ये पुन्हा लोकसभेत गेले. 2009 मध्ये पहिल्यांदाच पराभव. त्यानंतर पुन्हा संसदेत आले नाहीत.
२०१५ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश. तर वर्षभरापूर्वी भाजपला रामराम करत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गमांग यांच्या प्रवेशाने काँग्रेसला फायदा होईल, अशी चर्चा. त्यांच्यासोबत दोन माजी खासदारही काँग्रेसमध्ये दाखल.