Amol Sutar
राजकीय नेत्यांचे जीवन हे नेहमीच धावपळीचे असते. त्यामुळे अनेकांचे शरीराकडे दुर्लक्ष होते. पण त्याला माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे अपवाद ठरत आहेत.
न चुकता दररोज 300 जोर मारणे हा जयकुमार गोरेंचा नियमित व्यायाम होय. राजकीय धामधुमीत यात फक्त कमी - जास्त प्रमाण होवू शकतं पण थांबू शकत नाही.
आमदार गोरे हे रोज 6 ते 7 किलोमिटर रनिंग करतात. त्यांच्यासाठी शरीर फिट असणे राजकारणा इतकेच महत्वाचे आहे.
आमदार गोरे निवडणुकांच्या धावपळीतही रात्री कितीही वाजता झोपले तरी त्यांना सकाळी 5.30 वाजता विना आलार्म जाग येते. तशी त्यांच्या शरीराला सवय लागून राहिली आहे.
आमदार गोरे हे शुद्ध शाकाहारी आहार घेतात. जीम करत असताना त्यांचा डाइट प्लान असला तरी ते कोणताही मांसाहार करत नाहीत.
दररोज 200 बैठका हा सुद्धा गोरेंच्या व्यायामाच एक भाग आहे. त्यांना जीमला जायला वेळ होत असेल किंवा ते बाहेर असतील तर ते रुममध्येच व्यायाम करतात.
माझी शारीरिक स्थिती उत्तम आहे. तसेच व्यायामाने मी आणि माझी मानसिक स्थिती स्ट्रॉंग आहे, असे आमदार गोरे सांगतात.
राजकारण्यांच्याच नव्हे तर प्रत्येकाच्या जीवनातील फिजिकल फिटनेस हा महत्वाचा घटक आहे. प्रत्येकाने आपल्या शरीराकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला ते नेहमीच युवकांना देतात.
फक्त व्यायामच नव्हे तर आमदार गोरे हे एक उत्तम खेळाडू आहेत. ते लांब उडी, ॲथलेटिक्स तसेच बॅडमिंटन उत्कृष्ठ प्रकारे खेळतात.