Aslam Shanedivan
पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसर खोऱ्यात निष्पाप पर्यटकांचा धर्म विचारून निर्घृण नरसंहार केला.
त्या नरसंहारानंतर भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडलेच शिवाय चीन आणि तुर्कीसारख्या दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांचा बुरखा देखील फाडला.
यावेळी भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तान चीन आणि तुर्कीने दिलेल्या रडार, क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रांचा सुपडा साफ झाला.
त्यानंतर आता ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने वापरलेल्या शस्त्रांची चर्चा होत आहे. यामध्ये भारताने स्वदेशी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर करत आकाश एसएएम + आकाशतीर प्रणालीचा वापर केला होता.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तामधील कारवाईत भारताने रुद्रम अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्र आणि बॅटफिल्ड आयएसआरचा वापर केला होता.
भारताने ऑपरेशन सिंदूरसाठी हारोप आणि स्कायस्ट्रायकर ड्रोन तैनात करण्यासह D4S काउंटर-अनमानव एरियल व्हेईकल (UAV) सिस्टम वापरली. ज्यामुळे पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ले निष्क्रिय ठरले.
ऑपरेशन सिंदूरनंतर संभाव्य स्थिती लक्षात घेता M777 अल्ट्रा-लाइट हॉवित्झर नियंत्रण रेषा तैनात केले होते. तर नियंत्रण रेषेवर गस्त घालण्यासाठी अपग्रेड केलेले टी-72 युद्ध टँक आणि झोरावर लाईट टँक तैनात केले होते.
ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या हवाई प्लॅटफॉर्ममध्ये राफेल, एसयू-30 एमकेआय, मिराज 2000 या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी महत्वाची भूमिका पार पाडली.