Rashmi Mane
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट यांची प्रेमकथा सध्या चर्चेत आहे. चला जाणून घेऊया…
ब्रिजिट मॅक्रॉन सध्या 72 वर्षांच्या आहेत, तर इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत फक्त 47 वर्षांचे!
हा वयाचा 25 वर्षांचा फरक असूनही त्यांचं प्रेम अधिक गहिरं झालं.
त्यांची पहिली भेट झाली एका शाळेत – Le Providence School, फ्रान्समध्ये.
तेव्हा मॅक्रॉन विद्यार्थी होते आणि ब्रिजिट त्यांची शिक्षक!
हळूहळू त्यांचं नातं घट्ट होत गेलं, पण ब्रिजिटला वाटायचं की वयाचा फरक खूप मोठा आहे. तिला भीती होती की मॅक्रॉन आपल्याला सोडून दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडेल.
ब्रिजिटनं सांगितलं की, “जगाला आमच्या नात्याबद्दल कळल्यावर लोकांनी त्याला लफडं म्हटलं.” पण तरीही दोघंही आपल्या नात्यावर ठाम राहिले.
2007 मध्ये, जेव्हा मॅक्रॉन 29 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी ब्रिजिटशी लग्न केलं.
त्यांच्या लग्नावेळी ब्रिजिटचे तीन मोठे मुलंही उपस्थित होते.
मॅक्रॉन म्हणाले होते: “आम्हाला स्वीकारल्याबद्दल धन्यवाद, कारण आम्ही सामान्य जोडपे नाही.” खूप प्रेमळ आणि समजूतदार नातं!
आजही, 18 वर्षांनंतर, इमॅन्युएल आणि ब्रिजिट मॅक्रॉन एकत्र आहेत – मजबूत, न मोडणाऱ्या नात्यात. प्रेमाला वयाचं बंधन नसतं, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.