Beed leaders Accident : नियतीने का दिला बीडला अपघातांचा शाप? चार नेत्यांच्या निधनांची दुर्दैवी कहाणी

Rashmi Mane

बीड जिल्ह्याचे दुर्दैव

गेल्या 45 वर्षांत चार कर्तबगार आमदारांचे अपघाती निधन. नियतीने या जिल्ह्याला का दिला हा शाप?

Beed district leaders accident | Sarkarnama

नियतीची पुनरावृत्ती?

या चौघांच्या निधनात एक समान धागा होता तो म्हणजे अपघात. जिल्ह्याच्या राजकीय नेतृत्वावर अपघाताचा शाप का?

Beed district leaders accident | Sarkarnama

रघुनाथराव मुंडे (1980)

रेणापूरचे दोन वेळा आमदार. मुंबईत रहस्यमय अपघातात मृत्यू. अजातशत्रू नेते. शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक.

Beed district leaders accident | Sarkarnama

गोपीनाथ मुंडे (2014)

पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री. दिल्लीतील कार अपघातात मृत्यू. बीडच नव्हे, मराठवाड्यालाही मोठा धक्का.

Beed district leaders accident | Sarkarnama

विनायक मेटे (2022)

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे ‘शिवसंग्राम’चे नेते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात. जनतेशी खऱ्या अर्थाने जोडलेले नेतृत्व.

Beed district leaders accident | Sarkarnama

आर.टी. देशमुख (2025)

माजलगावचे माजी आमदार. सामान्य घरातून आलेले, मितभाषी व लोकाभिमुख. अपघातात अकाली मृत्यू.

Beed district leaders accident | Sarkarnama

साधेपणातून उभारी

या सर्व नेत्यांचे वैशिष्ट्य ते साध्या घरातून आलेले होते, आणि शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढले.

Beed district leaders accident | Sarkarnama

मराठवाड्याची मोठी हानी

विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, राजीव सातव यांच्यासारखे नेतेही अकाली गेले. मराठवाड्याच्या राजकारणात आज मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हे नेते गेले असले तरी त्यांची कार्ये, विचार आणि प्रेरणा पुढच्या पिढ्यांना दिशा देत राहतील.

Beed district leaders accident | Sarkarnama

Next : सरकारी नोकरीसाठी तयार आहात का? NTPC मध्ये भरती सुरू!

येथे क्लिक