Pradeep Pendhare
राहुल गांधी देशातील एक नंबरचे आतंकवादी असल्याचे भाजप नेता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांचं विधान.
पुढील काळात राहुल गांधी यांचे हाल त्यांच्या आजीसारखी करू, असं धमकीचं विधान दिल्ली भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह यांनी केलं आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस जाहीर केलं.
राज्यसभेवरील भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जीभेला चटके देण्याची भाषा वापरली.
परदेशात आरक्षणावर केलेल्या विधानावरून रामदास आठवलेंची राहुल गांधींचा पासपोर्ट रद्दची मागणी
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींविरोधातील प्रक्षोभक विधानांची दखल घेण्याचं विनंती पत्र पाठवलं.
राहुल गांधी यांच्याविरोधात प्रक्षोभक विधानं करणारे शिवसेना आमदार आणि भाजप खासदाराविरुद्ध फौजदारी कारवाईची विजय वडेट्टीवार यांची मागणी
राहुल गांधी यांच्याविरोधात महायुती भाजपकडून होत असलेल्या प्रक्षोभक विधानांचा फायदा काँग्रेसला महाराष्ट्रासह झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये होण्याची शक्यता?
महायुती भाजपकडून प्रक्षोभक विधानांवर काँग्रेस कार्यकर्ता आक्रमक असले, तरी राहुल गांधींनी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.