Vijaykumar Dudhale
भरत गोगावले कट्टर शिवसैनिक...अगोदर ठाकरेंशी एकनिष्ठ बंडानंतर मात्र एकनाथ शिंदेंना खंबीर साथ दिली.
भरत गोगावले हे 2009 पासून रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाकरेंच्या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांना अपेक्षा होती, ती पूर्ण होऊ शकली नव्हती.
शिवसेनेत बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय. शिंदेंसोबत भरत गोगावले हे गुवाहाटीला गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील महत्वाचे असलेले प्रतोदपद भरत गोगावले यांच्याकडे सोपवले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच यादीत भरत गोगावले यांचे नाव होते. मात्र, इतरांना समाविष्ठ करण्यासाठी गोगावले यांना वगळण्यात आले.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवेळी भरत गोगावले यांचे नाव मंत्रिपदासाठी अग्रभागी असायचे. पण आजपर्यंत तरी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी त्यांनी कोट शिवून घेतला होता, त्याबाबत त्यांनी केलेले विधान चर्चेत होते.
दोन दिवसांपूवी झालेल्या महामंडळाच्या नियुक्तीवेळी भरत गोगावले यांना एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबत ऑफर देण्यात आली होती. मात्र, एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारायचे की नाही, यावर गोगावले यांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही.