Rajanand More
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव करत भाजपने सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे.
विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांच्याप्रमाणेच आमदार अग्निमित्रा पॉल यांचेही नाव आघाडीवर आहे.
अग्निमित्रा पॉल या आसनसोल दक्षिण मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तापस बॅनर्जी यांचा सुमारे 40,000 मतांनी पराभव केला.
अग्निमित्रा पॉल फॅशन डिझायनर म्हणून प्रसिध्द होत्या. राजकारणात आल्यानंतरही त्यांनी कामाच्या जोरावर आपली लोकप्रियता वाढविली.
भाजपमध्ये २०१९ मध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. सध्या त्या उपाध्यक्ष आहेत.
२०२१ मध्ये त्यांनी आसनसोल दक्षिण मतदारसंघातूनही विधानसभेची पहिली निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी टीएमसीच्या सायोनी घोष यांचा पराभव केला होता.
लोकसभेची २०२२ ची पोटनिवडणूक आणि २०२४ निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिले होते. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव.
पक्षाच्या अनेक सरकारविरोधी आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. अनेक आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले. आता ममता बॅनर्जी पायउतार झाल्यानंतर एक महिला म्हणून अग्निमित्रा पॉल यांना मिळू शकते.