Rajanand More
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. तसेच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचाही सुपडा साफ झाला आहे.
राज्यात काँग्रेसने सर्व २९४ जागांवर उमेदवार उतरविले होते. त्यापैकी दोन उमेदवार विजयी झाले. तर बड्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
काँग्रेसच्या नेत्या मौसम नूर यांनी मालतीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
नूर यांच्याविरोधात टीएमसीचे अब्दुर रहिम बॉक्सी हे उमेदवार होते. तर भाजपने आशिष दास यांना तिकीट दिले होते. बॉक्सी हे तब्बल ६० हजार मतांनी विजयी झाले.
मौसम नूर यांनी जानेवारी महिन्यांतच राज्यसभा खासदाकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या तृणमूल काँग्रेसच्या सदस्य होत्या. एप्रिल महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपणार होता.
मौसम नूर या मालदा उत्तर मतदारसंघाच्या दोनदा खासदारही होत्या. त्यांचा प्रवेशाने पक्षाला मालदा भागात फायदा होईल, अशा आशा होती. मात्र, नूर यांच पराभूत.
नूर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याच पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविली, मात्र भाजपकडून त्यांचा पराभव झाला.
सलग दुसऱ्या पराभवामुळे मौसम नूर यांच्या राजकारणाला खीळ बसल्याची चर्चा आहे. मालदा भागातील राजकारणात त्यांचे वडील आणि आईचाही दबदबा होता.