Rashmi Mane
भारत सरकारने 2022 मध्ये अग्निपथ योजना सुरू केली. यामार्फत तरुणांना 4 वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी दिली जाते – ज्याला 'अग्निवीर' म्हटले जाते.
अग्निवीर हे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये 4 वर्षांसाठी भरती होणारे जवान असतात. त्यांना प्रशिक्षण, वेतन, भत्ते व सेवा निवृत्तीनंतर सेवानिवृत्ती लाभ दिले जातात.
भारतीय लष्करात अग्निवीर म्हणून भरती झाल्यावर पहिल्या वर्षी एकूण वार्षिक पगार 30,000 असतो (कर वगळून). चौथ्या वर्षी तो 40,000 पर्यंत पोहोचतो.
‘अग्निवायु’ हा शब्द भारतीय हवाई दलात भरती होणाऱ्या अग्निवीरांसाठी वापरला जातो. त्यांचे कार्य तांत्रिक व आधुनिक यंत्रसामग्रीशी संबंधित असते.
हवाई दलात अग्निवायु म्हणून भरती झाल्यासही सुरुवातीचा पगार 30,000 पासून सुरू होतो. मात्र, त्यांना अधिक तांत्रिक प्रशिक्षणे आणि भत्त्यांमुळे 'इन-हँड' पगार थोडा जास्त असतो.
पहिल्या वर्षी दोघांचाही पगार सारखा – ₹30,000/महिना
चौथ्या वर्षी पगार वाढून ₹40,000/महिना
पण, वायूदलात ‘टेक्निकल ड्युटी’मुळे अतिरिक्त भत्ते मिळतात.
दोन्ही दलांमध्ये 4 वर्षांच्या सेवेनंतर एकरकमी सेवा निधी ₹11.71 लाख मिळतो. यावर कोणताही कर लागू होत नाही.
जर तुम्हाला टेक्निकल फील्ड आवडत असेल तर अग्निवायु हा पर्याय अधिक फायदेशीर वाटतो. पगारासोबतच आधुनिक कौशल्य प्रशिक्षणही मिळते.