सरकारनामा ब्यूरो
2024 ला शिक्षण व्यवस्थेने भारतीय सैन्यातील अग्निवीर भरतीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. ते कोणते जाणून घेऊयात...
देशातील सगळ्या सैन्य भरती बोर्डला या नवीन नियमाबाबतची माहिती देत त्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विभागातील काही पदांसाठी ही टायपिंगची परीक्षा असून या चाचणी परीक्षेत टायपिंगचा वेग किती असेल याची माहिती लवकरच कळवण्यात येईल.
सैन्य दलातील स्टोअरकीपर आणि लिपीक या पदासांठी परीक्षा देणाऱ्यांना ही चाचणी परीक्षा सक्तीची असणार आहे.
बिहार-झारखंडच्या आर्मी रिक्रूटमेंट बोर्ड डायरेक्टरेटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,या पदांच्या टायपिंग चाचणीसाठी किती मार्कस आवश्यक आहे हे आणखी निश्चित झालेले नाही.
इंग्रजी आणि हिंदी भाषेसाठी प्रति मिनिट 35 किंवा 30 शब्द इतकी टायपिंगची गती असेल अशी चर्चा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
चक्कर मैदान येथील मुझफ्फरपूर सैन्य भरती बोर्डमध्ये या परीक्षेसाठी मस्तीपूर, मधुबनी, दरभंगा, सीतामढी, शिवहर, पूर्व चंपारण जिल्ह्याचा समावेश असणार आहे.
अग्निवीर भरतीसाठी केवळ विज्ञान शाखेतीलच नाही, तर कला शाखेतील विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत. सर्व विषयांमध्ये विद्यार्थाला किमान 60% किंवा 50 टक्क्यांहून अधिक गुण असणे आवश्यक आहे.