सरकारनामा ब्यूरो
13 जानेवारी 2025 पासून उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू होणारा कुंभमेळा 45 दिवसाचा असणार आहे. याची मेळ्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.
या कुंभमेळाव्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने लोक, साधू प्रयागराजच्या संगम घाटावर स्नान करण्यासाठी येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये बोलताना म्हणाले, कुंभमेळा हा 2025 चा एकतेचा संदेश देणारा उत्सव असणार आहे. हा उत्सव म्हणजे एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे.
या मेळाव्यात येणाऱ्या भाविकांसाठी विविध प्रकारच्या व्यवस्था राबवण्यात येणार आहेत.
महाकुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदाच 'एआय चॅटबॉट' चा वापर केला जाणार आहे. या डिजिटल नेव्हिगेशन सुविधेमुळे नागरिकांना ठिकाणे, विविध घाट, मंदिरे तसेच साधूच्या तंबूपर्यंत जाण्यास मदत होणार आहे. हा 'एआय चॅटबॉट' 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.
पाण्याखाली 100 मीटर आणि जमिनीपासून 120 मीटर उंचीपर्यत लक्ष ठेवणाऱ्या 'टेथर्ड ड्रोन' चा वापार केला जाणार आहे. जो आकाशातून आणि पाण्याखाली हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेऊ शकणार आहे.
कुंभमेळ्याच्यानिमित्ताने अयोध्येमधील राम मंदिरातील रामच्या मूर्तीचा अभिषेक देखील यावेळी होणार आहे. येथे देखील 'टेथर्ड ड्रोन' चा वापर केला जाणार आहे.
कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशामधील 92 गावांच्या रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणारं आहे. तर 30 पूलाचे देखील बांधणी होणार आहे. तसेच भारतातील जवळ- जवळ 80 भाषांमधील चिन्हेही येथे लावली जाणार आहेत .