Deepak Kulkarni
केंद्र सरकारने 2022 मध्ये जाहीर केलेली अग्निवीर योजना ही देशभक्त तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
युवकांना या योजनेद्वारे भारतीय लष्कर, नौदल व वायूदलामध्ये अग्निवीर म्हणून 4 वर्षांच्या सेवेची संधी प्रदान केली जाते.
विरोधकांकडून ‘अग्निवीर योजनेवर सुरुवातीला प्रचंड टीका करण्यात आली होती.
केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालय आता या योजनेत एक मोठा बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अग्निवीर योजनेंतर्गत सध्या 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या जवानांपैकी 25 टक्के जवानांनाच सैन्यात पुढे कायम सेवेसाठी निवडले जाते.
आता सरकार अग्निवीर जवानांपैकी 75 टक्के जवानांना कायमस्वरुपी सैन्यात नोकरीवर ठेवण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारनं जर आगामी काळात जर अग्निवीर योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतला,तर अधिकाधिक जवानांना सैन्यात कायमस्वरुपी सेवा करण्याची संधी मिळणार आहे.
या अग्निवीर योजना अंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना आर्थिक मानधन व अनेक सोयी सुविधाही दिल्या जातात.
अग्निवीर योजनेअंतर्गत सरकार आणि संरक्षण मंत्रालयाला आपले सुरक्षा दल आणखी मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे.