Jagdish Patil
सैन्यदलात ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अग्निवीरांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
ज्या अग्निवीरांचा 4 वर्षांचा सेवाकाळ संपत आला होता, त्यांना आणखी 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आला आहे.
या निर्णयाची घोषणा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन. एस. राजा सुब्रह्मण्यम यांनी केली.
या निर्णयामुळे दोन वर्षांच्या वाढीव कालावधीत अग्निवीरांना आकर्षक वेतनासह अतिरिक्त सोयी-सुविधा मिळणार आहेत.
तसंच वाढीव 2 वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल.
त्यानंतर पात्र अग्निवीरांना भारतीय सैन्यदलात कायमस्वरूपी रुजू होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता अग्निवीरांचा लष्कराचे नियमित सैनिक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लष्कराची कार्यक्षमता वाढवणे आणि तरुणांना सैन्यदलात दीर्घकाळ सेवा बजावण्याची संधी देण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
तर देशाच्या सैन्यदलांमध्ये सध्या 3.18 लाख अग्निवीर सेवा देत असल्याचं सीडीएस यांनी सांगितलं.