Aslam Shanedivan
आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना शेतीतील परदेशी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी कृषी विभागामार्फत परदेशी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते.
या योजने प्रवास, निवास आणि परकीय चलनातील दरवाढ लक्षात घेता बदल करण्यात आला आहे.
या योजनेतील विद्यमान 1 लाख रुपयांच्या मर्यादेत दुप्पट वाढ करण्यात आली असून आता अनुदान 2 लाख मिळणार आहे.
याबाबतची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असून हा निर्णय शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटलं आहे
या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील शेतकरी अमेरिका, इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, फ्रान्स, थायलंड इत्यादी देशात गेले आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येते.
शेतकऱ्यांना विदेशात जाऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील यशस्वी मॉडेल्स आणि बाजारपेठीय पद्धतींचा अभ्यास करता येतो.
अत्याधुनिक यांत्रिकी शेती, ठिबक सिंचन आणि जलव्यवस्थापन, जैविक शेती, कृषी उत्पादन प्रक्रिया व मूल्यवर्धन, कृषी निर्यात आणि विपणन, उत्पादन खर्चात बचत, दर्जेदार बाजारपेठा उपलब्ध होण्यास मदत मिळते.