Ganesh Sonawane
अधिकारी फोन उचलत नाहीत किंवा अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर संपर्कास अडचणी येतात अशी शेतकऱ्यांची तक्रार असते.
या पार्श्वभूमीवर अधिकारी जरी बदलला तरी फोन नंबर तोच असावा यासाठी कृषीमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला.
कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृषी विभागाकडून १३ हजार १४१ सिम कार्डचे वाटप करण्यात आले आहे.
एका सिम कार्डसाठी प्रति महिना १९५.३० रुपये खर्च येणार असून यामुळे महिन्याकाठी कृषी विभागाला २४ लाख रुपये बिल भरावे लागणार आहे.
शेतकऱ्यांना संवाद साधण्यास सोपे व्हावे म्हणून राज्यातील सर्व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना हे सिम कार्ड देण्यात येणार आहे.
त्यामुळे अधिकाऱ्यांची बदली झाली तरीही त्या जागेवर येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांना तो नंबर किंवा सिम कार्ड देण्यात येणार आहे.
'कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधता न आल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना एखाद्या मार्गदर्शनाची गरज असेल आणि अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक बदलला असेल तर शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागते.
अधिकाऱ्यांना एकच नंबर असावा म्हणून ही योजना महावितरणच्या धर्तीवर राबविण्यात येत आहे अशी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.