Rashmi Mane
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारी योजनांचा लाभ आणि आर्थिक मदत मिळवण्यासाठी AgriStack नोंदणीसह Farmer ID असणे आवश्यक आहे. अन्यथा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
शेतीशी संबंधित सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती एकत्रित केली जात आहे. यासाठी Farmer ID महत्त्वाचा ठरणार आहे.
दुष्काळ मदत आणि इतर सरकारी योजनांचे पैसे मिळवताना Farmer ID आवश्यक ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी लवकर पूर्ण करावी.
AgriStack नोंदणीसाठी सर्वप्रथम अधिकृत Unified Farmer Service Interface पोर्टलला भेट द्या.
पोर्टलवर आधार क्रमांक टाका. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP भरून पडताळणी पूर्ण करा.
यानंतर सातबारा उतारा, सर्व्हे क्रमांक आणि जमिनीशी संबंधित आवश्यक माहिती भरा. महसूल विभागाकडून या माहितीची पडताळणी केली जाते.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिजिटल Farmer ID मिळवता येतो. यासाठी आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.
स्वतः नोंदणी करता येत नसल्यास जवळच्या CSC म्हणजेच नागरी सुविधा केंद्रात जा. आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी पूर्ण करा आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपली माहिती अद्ययावत ठेवा.