ऑनलाइन शॉपिंग करताना सावधान! 1 जानेवारीपासून बदलणार नियम; ग्राहकांना काय फायदा?

Pradeep Pendhare

ऑनलाइन शॉपिंग

केंद्र सरकारने ग्राहक संरक्षणासाठी ई-कॉमर्स नियमांमध्ये सुधारणा केली असून, 1 जानेवारी 2027 पासून नवे नियम लागू होणार आहेत.

Online Shopping | Sarkarnama

खोटे डिस्काउंट थांबणार?

मूळ किंमत वाढवून डिस्काउंट जास्त दाखवला जातो, अशी ग्राहकांच्या तक्रारीवर करावाई होणार.नव्या नियमानुसार कमी केलेली किंमत आणि आधीची किंमत दोन्ही दाखवावी लागणार.

Online Shopping | Sarkarnama

प्रॉडक्ट ओळखता येणार!

नव्या नियमानुसार Sponsored Listings म्हणजेच पैसे देऊन वर दाखवलेल्या उत्पादनांची स्पष्ट ओळख द्यावी लागणार आहे. यामुळे जाहिरात आणि सामान्य सर्च रिझल्ट यातील फरक ग्राहकांना समजेल.

Online Shopping | Sarkarnama

मनमानी थांबणार!

ग्राहकाची दिशाभूल होईल अशा पद्धतीने सर्च रिझल्ट किंवा रँकिंगमध्ये फेरफार करता येणार नाही. तसेच वस्तू किंवा विक्रेत्यांना रँकिंग देताना महत्त्वाचे निकष आणि त्यांचे सापेक्ष महत्त्व स्पष्ट करावे लागणार.

Online Shopping | Sarkarnama

Dark Patterns रोखणार!

ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांना नको असलेली वस्तू किंवा सेवा घेण्यास भाग पाडणाऱ्या डिझाइन पद्धतींना Dark Patterns प्रतिबंधक 2023च्या मार्गदर्शक तत्त्वांचे ई-कॉमर्स कंपन्यांना पालन करावे लागणार.

Online Shopping | Sarkarnama

48 तासांत उत्तर!

ऑनलाइन खरेदीत वस्तू खराब आली किंवा चुकीची वस्तू मिळाली, तर ग्राहक तक्रार करू शकतात. या तक्रारींवर 48 तासांच्या आत पोच द्यावी लागणार आहे.

Online Shopping | Sarkarnama

माहिती द्यावी लागणार

ऑनलाइन विक्रेत्याचे नाव, पत्ता आणि संपर्काची माहिती स्पष्ट द्यावी लागणार आहे. ग्राहकाने खरेदी केल्यानंतर लेखी मागणी केल्यास संबंधित विक्रेत्याची अधिक माहिती मिळणार आहे.

Online Shopping | Sarkarnama

कोणते फायदे?

ई-कॉमर्स कंपन्यांना राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या तक्रार निवारण व्यवस्थेशी जोडले जावे लागेल, हा सर्वात मोठा फायदा होणार आहे.Online Shopping

Online Shopping | Sarkarnama

शुल्कवर निर्बंध

ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी असंबंधित सेवांसाठी एकत्रित शुल्क आकारण्यावर निर्बंध असणार आहेत. ऑनलाइन शाॅपिंगचे नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होतील.

Online Shopping | Sarkarnama

NEXT : गावाचे शहर कसे होते?

येथे क्लिक करा :