Mayur Ratnaparkhe
बीआरएस खासदार डॉ रणजीत रेड्डी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने रणजीत रेड्डी संतापले होते, असं बोललं जात आहे.
ते काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात आणि चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात
मी माझ्या सर्व समर्थकांना आणि लोकांना कळवत आहे की मी औपचारिकपणे बीआरएस सोडला आहे, असं त्यांनी जाहीर केलं.
मला बीआरएस पक्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, मला अनेक संधी दिल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो. असंही ते म्हणाले.
रणजीत रेड्डी यांनीही राजीनाम्यामागचे कारण सांगितले.
काही राजकीय परिस्थितीमुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार रणजीत रेड्डी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पक्षाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
पक्ष कार्यकर्त्यांसह समर्थकांचेही त्यांनी सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
Next : सोलापूरसाठी भाजप युवा चेहरा देणार; राम सातपुतेंचे नाव चर्चेत