Ganesh Sonawane
अहिल्यानगरमध्ये रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा पाहायला मिळाला. 100 वर्षांच्या बहिणीने 104 वर्षांच्या भावाला राखी बांधली.
हा ऐतिहासिक क्षण राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे साजरा झाला. भावाबहिणीच्या नात्याचे उत्तम उदाहरण ठरला.
ह.भ.प. नारायण डौले यांचे वय 104 असून ते अजूनही तंदुरुस्त आहेत. पार्वताबाई भुजाडी या नारायण डौले यांची धाकटी बहीण. त्यांचे वय 100 आहे.
दोघांची शंभरी पार आहे, तरी भावाबहिणीचे प्रेम आणि आपुलकी कमी झाली नाही. आजही त्यांचे नाते तितकेच घट्ट आहे.
राखी बांधताना दोघांच्या चेहऱ्यावर भावूक समाधान झळकत होते. पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
या अनोख्या रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हजारो लोकांनी हे क्षण पाहून कौतुक केले.
शतायुषी भावाबहिणीचा हा रक्षाबंधन सोहळा अनेकांना प्रेरणा देणारा ठरला. नात्यांची खरी किंमत दाखवणारा हा दिवस.