Mangesh Mahale
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना यांनी साईबाबांच्या समाधीचं पूजन करून श्रींना राखी अर्पण केली.
छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील साई भक्त परिवाराकडून 35 किलो वजनाची 36 फूट लांब व 5 फूट रुंद अशी राखी साईबाबांच्या चरणी समर्पित केली
ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी 10 दिवसांत बनवली असून, 'ऑपरेशन सिंदूर'च्या थीमवर आधारित ही राखी आहे.
राखीत पंधरा मान्यवरांच्या छायाचित्रांचा वापर केला आहे. द्रौपदी मुर्मू, नरेंद्र मोदी, सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह आदींचे फोटो लावण्यात आला आहे.
साई मंदिराच्या बाहेर ज्या ठिकाणाहून साईच्या मूर्तीचे खिडकीद्वारे साईभक्त दर्शन घेतात, त्या ठिकाणी ही राखी लावण्यात आली आहे.
साई भक्त ही राखी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. तसंच फोटो घेण्यासाठीही येथे भक्तांची झुंबड उडाली आहे.
साईबाबांच्या शिर्डीत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हजारो बहिणींनी साईंना राखी बांधत हा सण साजरा केला.
देशभरात रक्षाबंधन उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. शिर्डीतही मोठ्या भक्तिभावानं आणि आस्थेनं हा सण साजरा केला जातोय.