Pradeep Pendhare
मंत्रिमंडळाच्या बैठकीसह इतर व्यवस्थेसाठी महायुती सरकारनं चौंडी इथं उभारलाय मंडप दीड कोटी रुपयांचा असून शाही शामियानाच आहे.
शाही शामियानाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर अहिल्यादेवी होळकर यांच्या छायाचित्राचा समावेश होता. मंत्रिमंडळ जिथं बसणार आहे, तिथं घोंगडीची व्यवस्था होती.
या मंडपात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीसाठी स्वतंत्र कक्ष उभारला आहे.
राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांसाठी देखील स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाला भेटण्यासाठी येणाऱ्यांना स्वतंत्र बैठक व्यवस्था होती.
चौंडीकडे येणारा रस्ता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या स्वागत कमानीनं व्यापला होता.
मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी ढोल-ताशे सज्ज होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरक्षितेसाठी तैनात पोलिस बळामुळे चौंडीला छावणीचं स्वरुप आलं होतं.