Mayor Jyoti Gade : महापौर ज्योती गाडे; 'सोधा' राजकारणाचा राजकीय वारसा

Pradeep Pendhare

गाडे अन् जाधव

मनपाच्या दहाव्या महापौरपदी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका ज्योती गाडे व उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव विराजमान झाले आहेत.

Mayor Jyoti Gade | Sarkarnama

नगरचा 'सोधा' पॅटर्न

अहिल्यानगरमध्ये सोधा (सोयरे-धायरे) राजकारण नेहमीच चर्चेत असते, आता महापौर निवडीनिमित्ताने ते पुन्हा चर्चेत आले आहे.

Mayor Jyoti Gade | Sarkarnama

कर्डिले यांची कन्या

महापौरपदी विराजमान झालेल्या ज्योती गाडे या भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कन्या आहेत.

Mayor Jyoti Gade | Sarkarnama

जगताप यांची मेहुणी

याशिवाय, ज्योती गाडे या अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची नात्याने मेहुणी लागते.

Mayor Jyoti Gade | Sarkarnama

बहि‍णींची गळाभेट

महापौरपदावर विराजमान होताच, ज्योती गाडे यांना अश्रू अनावर झाले. ज्योती गाडे यांनी मोठी बहीण तथा आमदार जगताप यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल जगताप यांची गळाभेट घेतली.

Mayor Jyoti Gade | Sarkarnama

छत्रपतींना अभिवादन

महापौर आणि उपमहापौरपदावर विराजमान होण्यापूर्वी भाजप-अजित पवार राष्ट्रवादी युतीच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं.

Mayor Jyoti Gade | Sarkarnama

ज्योती गाडेंची भावना

महापौरपदी निवड होताच, ज्योती गाडे यांनी वडील (कै.) शिवाजी कर्डिले व उपमुख्यमंत्री (कै.) अजितदादा पवार यांच्या आशीर्वाद हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया दिली.

Mayor Jyoti Gade | Sarkarnama

प्रशासकीय सोपस्कार

जिल्हाधिकारी पंकज आशिया, आयुक्त यशवंत डांगे आणि नगरविकास अधिकारी मेहेर लहारे यांच्या उपस्थित महापौर-उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया पार पडली.

Mayor Jyoti Gade | Sarkarnama

जाधव यांचा वारसा

उपमहापौरपदी धनंजय जाधव यांचे वडील कृष्णा जाधव हे माजी नगराध्यक्ष होते. जाधव यांची ओळख ते विखे पिता-पत्रांचे कट्टर समर्थक अशी आहे.

Mayor Jyoti Gade | Sarkarnama

भाजप-राष्ट्रवादी युती

अहिल्यानगर महापालिकेत अजित पवार राष्ट्रवादीचे 27, तर भाजपचे 25, असे युतीचे 52 नगरसेवक सत्तेत असणार आहेत.

Mayor Jyoti Gade | Sarkarnama

NEXT : अण्णामलाई यांनी निवडणुकीआधी दिला भाजपला धक्का...

येथे क्लिक करा :