K Annamalai : अण्णामलाई यांनी निवडणुकीआधी दिला भाजपला धक्का; महत्वाच्या पदाचा राजीनामा, कारण आलं समोर...

Rajanand More

के. अण्णामलाई

के. अण्णामलाई हे तमिळनाडू भाजपमधील एक मोठे राजकीय नेते आहेत. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष असून काही महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली आहे.

K. Annamalai | Sarkarnama

मोलाचे योगदान

अण्णामलाई हे आक्रमक युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. राज्यात भाजपला ओळख निर्माण करून देण्यात मोलाचे योगदान.

K Annamalai | Sarkarnama

अण्णाद्रमुकशी युती तोडली

मागील विधानसभा निवडणुकीवेळी अण्णामलाई यांच्या सांगण्यावरूनच भाजपने अण्णाद्रमुकसोबतची युती तोडल्याची चर्चा होती. या निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव.

K. Annamalai | Sarkarnama

पुन्हा युती अन् राजीनामा

तमिळनाडूत पुढील काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आहे. त्याआधी काही महिन्यांपूर्वी भाजपने पुन्हा अण्णाद्रमुकशी युती केली. पण त्यानंतर अण्णामलाई यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा.

K. Annamalai | Sarkarnama

निवडणुकीची जबाबदारी

विधानसभा निवडणुकीसाठी अण्णामलाई यांची महत्वाच्या सहा मतदारसंघांचे प्रभारी म्हणून काही दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती.

K. Annamalai | Sarkarnama

पदाचा राजीनामा

अण्णामलाई यांनी नुकताच प्रभारी पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत प्रदेश नेतृत्वाला माहिती दिल्याचे अण्णामलाई यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

K. Annamalai | Sarkarnama

नेमकं कारण काय?

अण्णामलाई यांनी राजीनाम्यामागे वडिलांच्या प्रकृतीचे कारण दिले आहे. त्यांचे डायलिसिस सुरू असल्याने तिकडे लक्ष देणे आपले पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे निवडणुकीत सक्रीय असणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

K. Annamalai | Sarkarnama

भाजपला धक्का

अण्णामलाई हे तमिळनाडूतील भाजपचा आक्रमक चेहरा आहेत. त्यांच्या निवडणुकीतील माघारीने पक्षाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

bjp | sarkarnama

NEXT : महापौरपद फिक्स होताच मंजुषा नागपुरे थेट अजितदादांच्या कामाच्या पध्दतीवर बोलल्या...

येथे क्लिक करा.