Pradeep Pendhare
पहिला भारतीय WWE सुपरस्टार म्हणून द ग्रेट खली यांच्याकडे पाहिलं जातं.
सात फूट उंच असलेल्या खलीनं 2006 मध्ये अंडरटेकरला हरवून लक्ष वेधून घेतलं.
2007मध्ये खलीनं 20 जणांच्या बॅटल रॉयल स्पर्धेत विजय मिळवून, वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली.The Great Khali BJP
द ग्रेट खली यांचं खरं नाव दलीप सिंह राणा असून, ते भारतीय-अमेरिकन माजी व्यावसायिक कुस्तीपटू, प्रमोटर अन् अभिनेता आहेत.
द ग्रेट खली फेब्रुवारी 2022 रोजी BJP मध्ये सामील झाले आहेत आणि तेव्हापासून ते भाजपचे सदस्य आहेत.
पंतप्रधान मोदींच्या विकासकामांवर विश्वास असल्याने भाजपमध्ये सामील झालो, असे त्यांनी म्हटले आहे.
द ग्रेट खली अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाल्याने चर्चाचा विषय ठरला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन द ग्रेट खली यांनी केलं.
द ग्रेट खली यांनी युवकांना नियमित व्यायामाचे आवाहन करताना, देशही सक्षम राहील असं सांगितलं.
भारताला विश्वगुरू बनवायचे असेल तर आरोग्य आणि शिस्त या दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे द ग्रेट खली यांनी सांगितलं.