Pradeep Pendhare
अभिनेत्री रवीना टंडन गळ्यात शिवसेना ठाकरे पक्षाचा गमछा घालून प्रचारात सहभागी झाल्याचं समोर आलं.
अभिनेत्री रवीना टंडन हिनं 90चं दशक गाजवलं. मात्र, ती सध्या राजकारणात उतरली की काय? असा प्रश्न होत आहे.
मुंबईतील वांद्रे पश्चिम इथल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रवीना टंडन सक्रिय झाली आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाने रविवारी प्रचार रॅली काढली होती. यात रवीना टंडन देखील सहभागी झाली होती.
ही पदयात्रा रॅली चिंबई ते कांतवाडी परिसरातून निघाली. या रॅलीचं मुख्य आकर्षण रवीना टंडन ठरली.
रवीना टंडनने गळ्यात शिवसेना ठाकरे पक्षाचा 'मशाल' चिन्हाचा गमछा घातला होता. तिनं मतदारांना मतदानाचं आवाहन केलं.
"महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी जे काही प्रामाणित प्रयत्न सुरू आहेत, या गोष्टीला साथ देणं माझं प्रथम कर्तव्य आहे".
"संकटकाळात ज्या पद्धतीनं काम झालं, हे कौतुकास्पद आहे", असं रवीना म्हणाली.
प्रचारादरम्यानचा तिचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.