IPS Pravin Dongare : महाराष्ट्राच्या सुपुत्राचा तमिळनाडूत डंका; CM विजयाच्या मर्जीतले IPS प्रवीण डोंगरे कोण?

Pradeep Pendhare

IPS बदल्या

IPS अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये CM विजय यांनी महाराष्ट्रातील अहिल्यानगर संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर मोठा विश्वास दाखवला.

IPS Pravin Dongare | Sarkarnama

IPS प्रवीण डोंगरे

तिरुचिरापल्ली जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी IPS प्रवीण डोंगरे यांची बढतीवर बदली करण्यात आली आहे.

IPS Pravin Dongare | Sarkarnama

महाराष्ट्रात चर्चा

मुख्यमंत्री विजय यांनी IPS प्रवीण डोंगरेवर दाखवलेला विश्वास, सध्या तामिळनाडूसह महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

IPS Pravin Dongare | Sarkarnama

2016ची बॅच

IPS प्रवीण डोंगरे 2016च्या बॅचचे अधिकारी असून, त्यांचे प्रारंभीचे शिक्षण संगमनेर इथं झालेले आहे.

IPS Pravin Dongare | Sarkarnama

पेट्रोकेमिकल पदवी

निवृत्त गटशिक्षण अधिकारी उमेश डोंगरे यांचे ते पुत्र असून, प्रवीण डोंगरे यांनी पेट्रोकेमिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

IPS Pravin Dongare 1 | Sarkarnama

अभ्यास केंद्र

प्रवीण डोंगरे उमेदीच्या काळात आदिवासी मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र चालवायचे. त्यातून पुढे त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली.

IPS Pravin Dongare 1 | Sarkarnama

पहिल्याच नियुक्ती

प्रवीण डोंगरे हे तामिळनाडूमधील तिरुवेरुंबूर इथं सहायक पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होत कामाचा ठसा उमटवला.

IPS Pravin Dongare 1 | Sarkarnama

कामाचा ठसा

चेन्नईच्या पश्चिम विभागातील दक्षता अन् पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागात कार्यरत असताना त्यांनी दमदार कामगिरी केली.

IPS Pravin Dongare 1 | Sarkarnama

बढती अन् जबाबदारी

मुख्यमंत्री थलपती विजय यांनी त्याचीच दखल घेत, प्रवीण डोंगरे यांची आता तिरुचिरापल्ली इथं पोलिस अधीक्षक पदावर बढती दिली आहे.

IPS Pravin Dongare 1 | Sarkarnama

NEXT : भारतीय लष्काराचा पुन्हा डंका!

येथे क्लिक करा :