Pradeep Pendhare
भारतीय लष्कर अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना 2025 सालचा प्रतिष्ठेचा ‘यूएन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द ईयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत, महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्रांकडून हा सन्मान दिला जात आहे.
युनिफिल अंतर्गत तैनात भारतीय बटालियनच्या ‘फिमेल एंगेजमेंट टीम’च्या कमांडर म्हणून मेजर बराक कार्यरत आहेत.
स्थानिक महिलांशी संवाद, सुरक्षा, आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक आणि संघर्षग्रस्त भागातील महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
मेजर अभिलाषा बराक या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला ‘कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट’ म्हणूनही ओळखल्या जातात.
29 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या International Day of United Nations Peacekeepers निमित्त न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्र मुख्यालयात बराक यांना गौरविण्यात येणार आहे.
भारतीय लष्करातील मेजर सुमन गव्हाणी यांना 2019 मध्ये, तर मेजर राधिका सेन यांना 2023 मध्ये हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता.
मेजर अभिलाषा बराक या हा मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या आहेत.
संयुक्त राष्ट्रांनी 2016 पासून हा पुरस्कार सुरू केला असून, शांतता मोहिमांमध्ये ‘महिला, शांतता आणि सुरक्षा’ या संकल्पनेला बळ देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या योगदानाचा गौरवासाठी दिला जातो.
मेजर अभिलाषा बराक यांचा हा सन्मान भारतीय महिला शक्तीची, भारतीय लष्कराची क्षमतेची पुन्हा एकदा जगासमोर नोंद करून दिली आहे.