पोलिस, न्यायाधीशांमध्ये SC, ST, OBC किती? ही धक्कादायक माहिती विचार करायला लावणारी...

Rajanand More

इंडिया जस्टीस रिपोर्ट

इंडिया जस्टीस रिपोर्ट 2025 नुकताच प्रसिध्द झाला असून त्यामध्ये न्यायदान, कारागृहे, पोलिस, पायाभूत सुविधा या निकषांच्या आधारे राज्यांची क्रमवारी ठरवण्यात आली आहे.

india Justice Report | Sarkarnama

महाराष्ट्र दहावा

या क्रमवारीत महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर असून देशात कर्नाटक राज्ये पहिल्या स्थानावर आहे. 2022 च्या तुलनेत महाराष्ट्राने वरचढ कामगिरी केली आहे.india Justice Report

india Justice Report | Sarkarnama

SC, ST, OBC किती?

अहवालामध्ये पोलिस आणि न्यायाधीशांमध्ये SC, ST, OBC समाजातील किती कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश आहेत, याची माहिती देण्यात आली आहे.

india Justice Report | Sarkarnama

पोलिस खाते

देशातील पोलिस खात्यात 59 टक्के कर्मचारी आणि अधिकारी हे एससी, एसटी किंवा ओबीसी वर्गातील आहेत. पण उच्च पदांवर मोठी तफावत आहे.

india Justice Report | Sarkarnama

तफावत

वरिष्ठ पदांवर एससी, एसटी, ओबीसींचे प्रमाण कमी आहे. एकूण पोलिसांपैकी 61 टक्के पोलिस एससी, एसटी किंवा ओबीसी वर्गातील आहेत. पण डीवायएसपीसारख्या वरिष्ठ पदांवर हे प्रमाण केवळ 16 टक्के आहे.

india Justice Report | Sarkarnama

न्यायाधीश

देशातील जिल्हा न्यायव्यवस्थेत केवळ 5 टक्के न्यायाधीश अनुसूचित जमातीचे आहे. तर 14 टक्के एसटी प्रवर्गातील आहेत.

india Justice Report | Sarkarnama

उच्च न्यायालय

2018 पासून नियुक्त केलेल्या 698 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांपैकी फक्त 37 टक्के न्यायाधीश अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

india Justice Report | Sarkarnama

प्रवर्गनिहाय प्रमाण

पोलिस खात्यात 31 टक्के ओबीसी, 17 टक्के एससी आणि 12 टक्के एसटी प्रवर्गातील कर्मचारी, अधिकारी आहेत. तर न्यायपालिकेत ओबीसींचे प्रतिनिधित्व 25.6 टक्के, 14 टक्के एससी आणि 5 टक्के एसटींचे प्रतिनिधित्व आहे.

Indian Police | Sarkarnama

NEXT : IPS ते कॉन्स्टेबल...! महिला पोलिसांबाबत धक्कादायक वास्तव समोर

येथे क्लिक करा.