Rashmi Mane
10 मिनिटं उशीर… आणि आयुष्य वाचलं! गुजरातच्या भूमि चौहान यांना ट्रॅफिकमुळे फ्लाइट चुकली… आणि त्याच फ्लाइटचा काही मिनिटांत अपघात झाला.
भूमीने सांगितलं, “माझी फ्लाइट मिस झाली... आणि नंतर कळलं की ती कोसळली आहे. मी हादरून गेले. देवी आईचं आभार मानते!”
अहमदाबाद शहरात ट्रॅफिक जाम. असल्यामुळे भूमी आणि तिचे वडील 10 मिनिटं उशिरा पोहोचले… एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग नाकारलं.
AI-171 फ्लाइट अहमदाबादहून लंडनला जात होती. टेकऑफनंतर काहीच वेळात मेडिकल कॉलेज परिसरात कोसळली. प्रवाशांचा मृत्यू झाला.
भूमीच्या आई-वडिलांनी देवीचा आशीर्वाद मानला.
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश. काही परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला आहे त्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
“दुखद घटना. मृत्यूंचं वर्णन शब्दांत करता येणार नाही.” प्रधानमंत्र्यांनी शोक व्यक्त करत मदतीचे आदेश दिले.
भूमी चौहानचं प्रकरण केवळ योगायोग? देव, नशीब की नियती? एक घटना… आणि अनेक प्रश्न…