Rashmi Mane
जगभरातील 80% विमान अपघात टेकऑफ किंवा लँडिंगच्या वेळेस होतात. पण का होत असं?
टेकऑफ आणि लँडिंग ही विमान प्रवासातील सर्वात गुंतागुंतीची आणि तांत्रिक अचूकता मागणारी प्रक्रिया असते. क्षुल्लक चूकही अपघातास कारणीभूत ठरू शकते.
या टप्प्यात पायलटला काही सेकंदात अनेक निर्णय घ्यावे लागतात. हवामान, रनवेची स्थिती, इतर विमानांची हालचाल – सगळं पाहावं लागतं.
लँडिंगच्या वेळी अचानक आलेल्या वाऱ्याचा वेग, पावसाचा मारा किंवा विजांचा कडकडाट – या गोष्टी विमानाच्या नियंत्रणावर परिणाम करतात.
टेकऑफच्या क्षणी जर इंजिन फेल झालं, तर पायलटकडे प्रतिसाद देण्यासाठी वेळ फार कमी असतो – त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.
कधी कधी कंट्रोल टॉवरशी योग्य संवाद न होणं अथवा पायलटकडून झालेली छोटी चूकही गंभीर अपघात घडवू शकते.
‘Mayday’ हा आपत्कालीन सिग्नल असतो. पायलट जेव्हा विमानात गंभीर तांत्रिक अडचण येते, तेव्हा "Mayday" कॉल देतो, ज्यामुळे तत्काळ मदत मिळते.
आजकाल विमानांमध्ये प्रगत सेन्सर्स, ऑटो-पायलट, रनवे अलर्ट सिस्टीम अशा अनेक तंत्रज्ञानांचा वापर होतो, जे अशा अपघात टाळण्यासाठी मदत करतात.