Rashmi Mane
देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. 1948 च्या जनगणना कायद्यानुसार केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यंदा पहिल्यांदाच जातीय जनगणनाही एकाचवेळी केली जाणार!
2021 मध्ये होणारी जनगणना कोरोनामुळे लांबली होती. आता सुरू होणार असून पुढची जनगणना 2035 मध्ये होईल.
पहिला टप्पा: ऑक्टोबर 2026 पर्यंत
दुसरा टप्पा: मार्च 2027 पर्यंत
महत्त्वाची तारीख: 1 मार्च 2027 – याच दिवशीचा डेटा अधिकृत मानला जाईल.
यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात. मोबाईल अॅप्स आणि Self-Enumeration (स्वतः माहिती भरण्याची सुविधा) उपलब्ध.
यंदा जात, उपजात, धर्म यासंबंधी थेट प्रश्न
34 लाख कर्मचारी, डिजिटल ट्रेनिंगसह कामाला लागणार
घरांचे सर्वेक्षण: पाणी, शौचालय, वीज, मालकी हक्क इ.
व्यक्तीगत माहिती: वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, स्थलांतर, धर्म, जात
1931 नंतर पहिल्यांदाच संपूर्ण जातीय माहिती घेतली जाणार.
OBC, SC, ST आणि सर्व सामान्य जातींची माहिती संकलित केली जाईल.
समाजिक न्याय, शैक्षणिक आरक्षण.
केंद्र व राज्य सरकारांच्या योजना.
केंद्रीय वित्त आयोगाकडून निधी वितरण यासाठी वापर.