Akshay Sabale
अहमदनगर शहराचा आज 534 वा स्थापना दिवस आहे.
अहमद निजामशहाने 1490 मध्ये या अहमदनगर शहराची स्थापना केली.
औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये वयाच्या 88 व्या वर्षी नगरमध्ये झाला.
नगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला निजामशहाने बांधला होता.
पौराणिकमध्ये रामायण, महाभारताचे काही संदर्भ नगर जिल्ह्याशी निगडित आहेत.
नवनाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथांची कर्मभूमी, कानिफनाथांची समाधी याच भूमीत आहे.
संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांचे वास्तव्य नगरमध्ये झालं होतं. ज्ञानेश्वरीची रचना याच भूमीत झाली आहे.
चले जाव आंदोलनावेळी पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आदी राष्ट्रीय नेते भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते.
नगरच्या भुईकोट किल्ल्यात पंडित नेहरूंनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला आहे.
ahilyabai holkar
अहमदनगरच्या नामांतराचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' प्रस्ताव राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.