Rajanand More
आम आदमी पक्षाचे पंजाबमधील नेते व संसदीय कार्य मंत्री. त्यांचा एक अश्लील व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
मंत्र्यांनी एका तरुणीला नोकरी अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली. व्हिडिओ कॉलवर कपडे काढायला लावले, असे भाजपचे आरोप.
बलकार सिंह यांनी आरोप फेटाळले आहेत. याविषयी आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बलकार सिंह हे सेवानिवृत्तीनंतर 2022 मध्ये आपच्या तिकीटावर पहिल्यांदाच आमदार झाले. वर्षभरात मंत्रिपद मिळाले.
1988 मध्ये पंजाब पोलिस दलात सहायक उपनिरीक्षक म्हणून रुजू. त्यानंतर काही वर्षांत पदोन्नतीने दोआबा भागातील अनेक पोलिस ठाण्यात एसएचओ म्हणून जबाबदारी.
डीएसपी, एसीपी, डीसीपी अशी पदोन्नती होत गेली. जालंधर, अमृतसर, लुधियाना या मोठ्या शहरांमध्ये महत्वाचा पदांवर काम. 2021 मध्ये सेवानिवृत्त.
विधानसभा निवडणुकीत आपकडून तिकीट. काँग्रेस उमेदवाराचा 4574 मतांनी पराभव केला होता. जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत केलेल्या कामानंतर मंत्रिपद.
अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपसह काँग्रेस नेत्यांकडून मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दबाव वाढला.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी काहीच भाष्य केले नाही.