CM relief fund war room : आरोग्य योजनांचे एकत्रीकरण, समन्वयासाठी ‘वॉर रूम’; काय आहे प्लॅन...

Pradeep Pendhare

‘वॉर रूम’ कशासाठी

राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी, दुहेरी लाभ टाळण्यासाठी अन् योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली करण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात येणार आहे.

CM relief fund war room | Sarkarnama

देखरेख कोणाची

ही वॉर रूम मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार आहे.

CM relief fund war room | Sarkarnama

कक्षाचे अध्यक्ष

महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कक्ष स्थापन असणार आहे.

CM relief fund war room | Sarkarnama

आरोग्य योजना

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना आदी इतरही योजना नागरिकांना मोफत किंवा सवलतीत उपचारांची सुविधा देतात.

CM relief fund war room | Sarkarnama

एकाच प्रकरणात विविध लाभ

काही प्रकरणांमध्ये एकाच रुग्णाने दोन किंवा अधिक योजनांचा लाभ घेतल्याची नोंद झाल्याने सरकारी निधीचा अपव्यय टाळण्यासाठी वॉर रूम स्थापन करण्यात येणार आहे.

CM relief fund war room | Sarkarnama

टोल-फ्री क्रमांक

राज्य व केंद्र सरकारच्या सर्व आरोग्य योजनांविषयी माहिती, मार्गदर्शन आणि मदत मिळावी यासाठी एकच सामान्य टोल-फ्री क्रमांक 1800 123 2211 उपलब्ध करून देण्यात आला आहे.

CM relief fund war room | Sarkarnama

समितीची रचना

केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत 12 सदस्य आहेत.

CM relief fund war room | Sarkarnama

पात्रतेनुसार लाभ

प्रत्येक नागरिकाला त्याच्या पात्रतेनुसार योग्य योजनेचा लाभ मिळावा आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचावा, यासाठी हा उपक्रम आहे, असे मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

CM relief fund war room | Sarkarnama

NEXT : न्यायमूर्तींच्या ड्रायव्हरच्या वकिलीचा डंका...

येथे क्लिक करा :