Ganesh Sonawane
गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. 242 प्रवाशांना घेऊन या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते.
दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात हे विमान खाली कोसळलं.
या अपघातात मोठी जीवितहानी झाली असून सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे.
या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 169 भारतीय नागरिक होते अशी माहिती आता मिळाली आहे.
तर, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे.
तसेच प्रवाशांमध्ये 11 लहानमुलं आणि 2 नवजात बालकांचाही समावेश होता अशी माहितीही समोर आली आहे.
हे विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या भागात रहिवासी वस्ती आहे. येथील वस्तीचे विमान अपघातात मोठे नुकसान झाले आहे.
विमान अपघातानंतर अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ बंद करण्यात आले. सर्व फ्लाइट्स तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या.