Aslam Shanedivan
देशासह जगाला हादरवून सोडणारी विमान दुर्घटना आज गुजरातमधील अहमदाबाद घडली. 242 प्रवाशी घेवून लंडन जाणारे विमान कोसळले.
या अपघातावेळी विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक प्रवास करत होते. तर 12 क्रू मेंबर्स होते.
पण याहीआधी अशा काही विमान दुर्घटना झाल्या आहेत. ज्यात देशातील महत्वाचे नेते आणि व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
होमी भाभा ज्यांना भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक म्हटले जाते. त्यांचे देखील 24 जानेवारी 1966 रोजी विमान अपघातात निधन झाले होते.
स्वत: पायलट असणाऱ्या संजय गांधी यांचा 23 जून 1980 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. विमानावरील नियंत्रण सुटल्याने ते नवी दिल्लीच्या डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये कोसळले.
30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याच्या मोट्टा गावात झालेल्या विमान अपघातात माधवराव सिंधिया यांचे निधन झाले होते. विमानाला आग लागल्याने ते कोसळले होते.
2 सप्टेंबर 2009 रोजी राजशेखर रेड्डी हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असतानाच खराब हवामानामुळे त्यांचा संपर्क तुटला होता. घनदाट नल्लामला जंगलात ते कोसल्याने त्याचा मृत झाला होता.
8 डिसेंबर 2021 रोजी देशाचे पहिले संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे देखील हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. या अपघातात त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 जणांचाही मृत्यू झाला होता.
टीडीपी नेते आणि लोकसभा अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांचा 3 मार्च 2002 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाला होता.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू 30 एप्रिल 2011 कामेंग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी हेलिकॉप्टर अपघातात त्याचे निधन झाले
उद्योगपती आणि हरियाणाचे माजी मंत्री ओपी जिंदाल, अभिनेत्री आणि भाजप नेत्या केएस सौम्या, हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल सुरेंद्र नाथ आणि त्यांच्या कुटुंबियांसह विमान अपघातात मृत्यू झाला होता